india, china, ladakh, chinaproduct 
देश

87 टक्के भारतीय म्हणतायत यापुढे चिनी वस्तू वापरणार नाही!

सकाळ डिजिटल टीम

 नवी दिल्ली- गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे भारतात चीनविरोधात संतापाची लाट पसरली आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाका अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यानुसार जवळजवळ 87 टक्के भारतीयांची चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची तयारी आहे. 235 जिल्ह्यांमध्ये एक सर्वेक्षण घेण्यात आले. सर्वेक्षणामध्ये सामिल झालेल्या लोकांपैकी 87 टक्के लोकांनी पुढील वर्षापर्यंत चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चिनी उत्पादनांविरोधात भारतीय नागरिक आक्रमक झाल्याचं दिसत आहेत. तसेच अनेकांनी रस्त्यावर उतरुन चिनी वस्तूंची होळी केली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'चा नारा दिला असल्याने चिनी वस्तूंविरोधातील आंदोलनाला चांगलीच धार आली आहे. 

टिकटॉक, विचॅट, शाओमी, विवो, ओप्पो, वनप्लस, शेन यासारख्या चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचा भारतीयांनी निर्धार केला आहे. चिनी कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकणार का? असा सवाल लोकांना विचारण्यात आला होता. यावेळी 58 टक्के लोकांनी चिनी वस्तू यापुढे खरेदी करणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच ज्या लोकांकडे सध्या चिनी कंपनीचे मोबाईल आहेत, त्यांनी यापुढे चिनी मोबाईल खरेदी करणार नसल्याचं म्हटलं आहे. चिनी उत्पादनांवर 200 टक्के आयात शुल्क लावायला हवा का? असा सवालही लोकांना विचारण्यात आला होता. यापैकी अनेकांनी यावर उत्तर देणे टाळले. मात्र, 42 टक्के लोकांनी चिनी वस्तूंवर 200 टक्के आयात शुल्क लावायला हवा, असं म्हटलं आहे. शिवाय भारत सरकारने चीनसारखं कमी किमतीत वस्तू उपलब्ध करुन द्याव्यात असं काही लोकांनी म्हटलं आहे. चिनी वस्तूंना बीआयएस, एफएसएसएआय, सीडीएससीओ, सीआरएस  प्रमाणपत्र आवश्यक करायला हवं असं 90 लोकाचं मत आहे.

शेजारी राष्ट्रासोबत तणाव निर्माण झाल्यास भारत सरकारने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय अनेकदा घेतला आहे. मात्र, चीनकडून मोठ्याप्रमाणात देशात आयात केली जाते. त्यामुळे चीनबाबतची परिस्थिती वेगळी आहे. अनेक चिनी वस्तू भारतीयांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्या आहेत. चिनी कंपनीच्या वस्तू या इतर कंपनीच्या वस्तूंपेक्षा स्वस्त असतात. त्यामुळे भारतीय चिनी उत्पादनांना पंसती देत आले आहेत. त्यामुळे देशवासीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला तर त्यांना वस्तू खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT